चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज चाळीसगाव(वार्ताहर ) चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी तातडीने मदत करावी मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने चाळीसगाव तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन देण्यात आले. मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समितीच्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन दिवसापासून पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडत तोच 27 सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी चाळीसगाव शहरासह तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले वाऱ्यासह कडकडात पाऊस झाल्याने उरल्या सुरल्या पिकांची अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल प्रचंड नुकसान पाहता शेतकऱ्यांच्या थोडाफार राहिलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून नेला आहे. शेतकऱ्यांची काही प्रमाणात जमिनीची माती देखील पुरामुळे वाहून गेली आहे. शेतकऱ्यांचे अश्रू आणि शेतातील उध्वस्त पिके पाहून मन व्यथित झाले आहे .शेतकरी जगाचा पोशिंदा आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास पूर्णतः हिरावून गेल्याने शेतकरी राज...