गौताळा घाटात भीषण अपघात; आयशर वाहन १०० फूट दरीत कोसळले

नवं दृष्टी न्यूज 

संपादक -सचिन गुंजाळ 





बारामतीहून दस्तापूरकडे परतणाऱ्या उसतोड मजुरांच्या आयशर वाहनाला गौताळा घाटात भीषण अपघात झाला. घाटातील धोकादायक वळणावर वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि आयशर सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले असून ६ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. दस्तापूर (ता. सोयगाव) येथील मजूर बारामती येथे उसतोडीचे काम करून आपल्या गावी परतत होते. कन्नड-नगर मार्गावरील गौताळा अभयारण्य परिसरात अचानक ब्रेक फेल झाल्याने वाहन संरक्षण भिंतीवर आदळले आणि दोन पलट्या घेत दरीत कोसळले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

जखमींची नावे :

महेश अंडुरे (चालक, रा. खेड, पुणे), अशोक पवार (४५), कोमल हिरालाल पवार (८), प्रतीक प्रविण वाघ (४), प्रविण बापू वाघ (३०), सलीम जमाल तडवी (४५, रा. दस्तापूर, ता. सोयगाव) यांच्यासह इतर काही जण जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच निरीक्षक कन्नड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस रामचंद्र पवार यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी