हनुमानवाडी परिसरात गोळीबार; युवक जखमी
नवं दृष्टी न्यूज
संपादक -सचिन गुंजाळ
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील हनुमानवाडी परिसरात रविवारी रात्री रेल्वे पुलाखाली गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेत सिकंदर शेख या युवकाच्या खांद्याला गोळी लागून तो जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हनुमानवाडी परिसरातील रेल्वे पुलाखाली सिकंदर शेख याच्यावर गोळीबार केला. गोळी खांद्याला लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला तातडीने उपचारासाठी देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिसराची पाहणी करून तपास सुरू केला आहे. गोळीबार नेमका कोणत्या कारणावरून झाला व आरोपी कोण आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
या घटनेमुळे हनुमानवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment