वडाळा-वडाळी येथे दिव्यांग मुलीवर ७२ वर्षीय व्यक्तीकडून अत्याचाराचा प्रयत्न
नवं दृष्टी न्यूज
चाळीसगाव : वडाळा-वडाळी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, ७२ वर्षीय व्यक्तीकडून एका दिव्यांग मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी युवराज चव्हाण (वय ७२) यांनी २३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास गावातील एका १३ वर्षीय दिव्यांग मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगी घरी एकटीच होती.
दरम्यान, अचानक मुलीचा भाऊ घरी आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आणि मोठा अनर्थ टळला. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Comments
Post a Comment