अवैध लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रक वनविभागाच्या कारवाईत जप्त
नवं दृष्टी न्यूज
संपादक -सचिन दिलीप
(चाळीसगाव प्रतिनिधी)
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील मालेगाव रस्त्यावर अवैधरीत्या निम, लोखंडी व भोकर जातीचे जळाऊ लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रक वनविभागाने जप्त केले. या कारवाईत MH19 G 0100 व MH20 DE 9252 क्रमांकाचे ट्रक ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार यांना 10 तारखेला रात्री गुप्त माहिती मिळाली की चाळीसगाव हद्दीतून अवैध लाकूड वाहतूक करणारे ट्रक मालेगावकडे जाणार आहेत. त्यानुसार त्यांनी तात्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी सापळा रचला.
या कारवाईदरम्यान रात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास निम, भोकर व लोखंडी प्रजातींचे जळाऊ लाकूड भरलेला एक ट्रक पकडण्यात आला. ट्रक चालकाकडे वाहतुकीसाठी आवश्यक परवानगीपत्राची चौकशी केली असता कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यामुळे हा ट्रक वनपरिक्षेत्र कार्यालय, चाळीसगाव येथे आणण्यात आला. त्यानंतर दुसरा ट्रक पहाटे सुमारे 4:30 वाजता पकडण्यात आला.
या दोन्ही ट्रकविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक जळगाव राम धोत्रे व वनसंरक्षक अमोल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार यांच्या नेतृत्वात पार पडली.
या पथकात वनपाल सी. डी. पाटील, वनपाल सागर पाटील, वनरक्षक ललित पाटील, अजय महिरे, काळू पवार, उमेश सोनवणे, रक्षकदार संजय गायकवाड, भदू अहिरे व राहुल मांढळे यांचा सहभाग होता. पुढील तपास वनपाल सागर पाटील करत आहेत.

Comments
Post a Comment