कजगाव येथे नगरसेवक सचिन गुंजाळ यांचा जंगी सत्कार
नवं दृष्टी न्यूज
अंबरनाथ येथील नगरसेवक सचिन गुंजाळ यांचा कजगांव येथे नागरिकांच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत त्यांनी मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
कजगाव येथे आगमन होताच स्थानिक नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
📰 उपस्थित मान्यवर:
मनुदास महाजन (जिल्हाध्यक्ष, अखिल ग्रामीण पत्रकार संघ), दिनेश पाटील, अनिल महाजन, संजय महाजन, अमिन पिंजारी, संजय कोतकर, सागर पाटील, उमेश वाणी, आबा बोबडे, उमेश वाघ, राजेंद्र चव्हाण, गडबड बोऱसे, आनंदा पाटील, किरण नाईक, सुनील बोबडे आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.




Comments
Post a Comment