Posts

Showing posts from March, 2026

सिलेंडर टंचाईचा प्रश्न गंभीर; काळाबाजाराचा संशय, कारवाईची मागणी रयत सेना

Image
  नवं दृष्टी न्यूज   चाळीसगाव (प्रतिनिधी): शहरात घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सीसमोर रोजच मोठ्या रांगा दिसत असल्या तरी अनेक ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही गॅस एजन्सीकडून जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याचबरोबर काही ठिकाणी गॅस सिलेंडर काळ्या बाजारात जादा दराने विक्री होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ग्राहकांना नियमानुसार मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त पैसे मोजावे लागत असून, बुकिंग करूनही वेळेत गॅस न मिळाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गॅस एजन्सींवर कठोर कारवाई करावी, तसेच पारदर्शक व नियमित गॅस वितरण व्यवस्था लागू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून, प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वडाळा-वडाळी येथे दिव्यांग मुलीवर ७२ वर्षीय व्यक्तीकडून अत्याचाराचा प्रयत्न

नवं दृष्टी न्यूज   चाळीसगाव : वडाळा-वडाळी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, ७२ वर्षीय व्यक्तीकडून एका दिव्यांग मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी युवराज चव्हाण (वय ७२) यांनी २३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास गावातील एका १३ वर्षीय दिव्यांग मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगी घरी एकटीच होती. दरम्यान, अचानक मुलीचा भाऊ घरी आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आणि मोठा अनर्थ टळला. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हनुमानवाडी परिसरात गोळीबार; युवक जखमी

Image
नवं दृष्टी न्यूज  संपादक -सचिन गुंजाळ  चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील हनुमानवाडी परिसरात रविवारी रात्री रेल्वे पुलाखाली गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेत सिकंदर शेख या युवकाच्या खांद्याला गोळी लागून तो जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हनुमानवाडी परिसरातील रेल्वे पुलाखाली सिकंदर शेख याच्यावर गोळीबार केला. गोळी खांद्याला लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला तातडीने उपचारासाठी देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिसराची पाहणी करून तपास सुरू केला आहे. गोळीबार नेमका कोणत्या कारणावरून झाला व आरोपी कोण आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे हनुमानवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.

अवैध लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रक वनविभागाच्या कारवाईत जप्त

Image
नवं दृष्टी न्यूज  संपादक -सचिन दिलीप  (चाळीसगाव प्रतिनिधी) वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील मालेगाव रस्त्यावर अवैधरीत्या निम, लोखंडी व भोकर जातीचे जळाऊ लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रक वनविभागाने जप्त केले. या कारवाईत MH19 G 0100 व MH20 DE 9252 क्रमांकाचे ट्रक ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार यांना 10 तारखेला रात्री गुप्त माहिती मिळाली की चाळीसगाव हद्दीतून अवैध लाकूड वाहतूक करणारे ट्रक मालेगावकडे जाणार आहेत. त्यानुसार त्यांनी तात्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी सापळा रचला. या कारवाईदरम्यान रात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास निम, भोकर व लोखंडी प्रजातींचे जळाऊ लाकूड भरलेला एक ट्रक पकडण्यात आला. ट्रक चालकाकडे वाहतुकीसाठी आवश्यक परवानगीपत्राची चौकशी केली असता कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यामुळे हा ट्रक वनपरिक्षेत्र कार्यालय, चाळीसगाव येथे आणण्यात आला. त्यानंतर दुसरा ट्रक पहाटे सुमारे 4:30 वाजता पकडण्यात आला. या दोन्ही ट्रकविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल कर...