राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने बक्षीस वितरण सोहळा संपन्न
संपादक -सचिन गुंजाळ नवं दृष्टी न्यूज
चाळीसगाव (वार्ताहार) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने 12 जानेवारी 2026 सकाळी 9 वाजता राष्ट्रीय कन्या शाळा येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजमाता जिजाऊ यांचे जीवनावर आधारित निबंध स्पर्धा 6 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय कन्या शाळा चाळीसगाव येथे घेण्यात आल्या होत्या .यावेळी या निबंध स्पर्धेत 480 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता .या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता राष्ट्रीय कन्या शाळा येथे आयोजित करण्यात आला होता . यावे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळीइयत्ता 8 प्रथम क्रमांक हर्षदा रविकिरण चव्हाण, द्वितीय क्रमांक पिंकी रामू कदरे, तृतीय क्रमांक श्रद्धा आशिष अहिरे, इयत्ता 9 वी प्रथम क्रमांक नेहा बापू चव्हाण, द्वितीय क्रमांक सेजल समीर धर्माधिकारी ,तृतीय क्रमांक यशश्री मनोज माळकर, इयत्ता 10वी प्रथम क्रमांक दिव्यांनी दीपक पाटील, द्वितीय क्रमांक योजना निलेश जोगी, तृतीय क्रमांक सपना दत्तू राठोड, इयत्ता 11वी प्रथम क्रमांक पल्लवी वाल्मीक बेलदार, द्वितीय क्रमांक सोनाली अनिल गुंजाल, तृतीय क्रमांक माधुरी रामकृष्ण माळी ,इयत्ता 12वी प्रथम क्रमांक आरती अनिल राठोड, तृतीय क्रमांक तनुश्री राजेंद्र राठोड, तृतीय क्रमांक जागृती जयलाल चव्हाण, अशा विद्यार्थिनींना अखिल भारतीय मराठा महासंघाने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील ,शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील,शहर सचिव सचिन गुंजाळ, तालुका युवक अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका संघटक शेखर पाटील, श्याम जाधव तसेच राष्ट्रीय कन्या शाळेच्या प्राचार्य अनिता पाटील मॅडम तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.


Comments
Post a Comment