आदिती जाधव हिस राजमाता जिजाऊ जयंती औचित्य साधून मराठा महासंघाच्या वतीने सन्मानित
संपादक -सचिन गुंजाळ नवं दृष्टी न्यूज
चाळीसगाव( वार्ताहार )आदिती जाधव हिला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सन्मानित करून प्रमाणपत्र देण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोल येथील अदिती अंबादास जाधव हिने मध्यप्रदेशात आयोजित राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत देशातून आलेल्या नामांकित खेळाडूंना पराभूत करत अदितीने अंतिम फेरीत विजय मिळवून गोल्ड मेडल वर आपले नाव कोरले .या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे .राजमाता जिजाऊ जयंती 12 जानेवारी 2026 रोजीचे अखिल भारतीय मराठा महासंघाने आदिती हिला सन्मानित करून प्रमाणपत्र दिले. व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे , जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले ,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील ,शहर सचिव सचिन गुंजाळ ,युवक तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील ,तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील तालुका संघटक शेखर पाटील उपस्थित होते.

Comments
Post a Comment