Posts

Showing posts from October, 2025

विषारी कप सिरप मुळे 23 चिमुरड्यांचा मृत्यू कंपनीच्या संचालकाला अटक

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज   नवी दिल्ली: श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली. सिरपमध्ये शरीराला अपायकारक घटक मिसळण्यात आले. हे औषध ज्या चिमुरड्यांना देण्यात आले त्यांची तब्येत बिघडल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली. तब्येत खालावली आणि मध्य प्रदेशमधील २३ बालकांचा मृत्यू झाला, या प्रकरणाची सरकारी पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. इथून पुढे कोणत्याही कफ सिरपची प्रत्येक बॅच तयार करण्याआधी त्याची चाचणी घेण्याचे बंधन सरकारने घातले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात कोल्ड्रिंक कफ सिरपची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच औषध विक्रेत्यांना कोल्ड्रिंकचा साठा असल्यास कंपनीकडे परत पाठवून द्या, असे आदेश दिले आहेत. विषारी कफ सिरप प्रकरणी श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन यांना अटक करण्यात आली आहे. रंगनाथन गोविंदन हे चेन्नई येथील घर आणि कांचीपुरम येथील कारखान्याला कुलुप लावून पत्नीसोबत फरार झाले होते. मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने दोन दिवस तामिळनाडूतील चेन्नईत ठिकठिकाणी धाडी टाकल्या. पोलिसा...

चाळीसगाव नगरपालिकेचा प्रभाग रचनेचा तक्ता जाहीर

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  चाळीसगाव (वार्ताहार) नगरपालिका निवडणुकीसाठी चाळीसगाव शहरातील प्रभाग आरक्षणाचा तक्ता आज दिनांक 8ऑक्टोबर रोजी जाहीर केलेला आहे. एकूण 18 प्रभागासाठी अ आणि ब या गटानुसार पुरुष व महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.  तक्त्यानुसार  प्रभाग क्रमांक 1 ते 4 जनरल पुरुषांसाठी तर त्यांचे जोड प्रभाग अनुक्रमे जनरल महिला ,ओबीसी महिला आरक्षित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 7,8,10,11 ओबीसी पुरुषांसाठी तर त्यांच्या जोड प्रभागात जनरल व ओबीसी महिला यांना आरक्षण देण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 9 एस सी पुरुष तर जोड प्रभाग  जनरल महिला यांच्यासाठी राखीव आहे.  प्रभाग क्रमांक 12 ते 18 या गटात बहुसंख्य प्रभाग जनरल पुरुषांसाठी असून जोड प्रभागात एसी महिला ओबीसी महिला आणि जनरल महिला आरक्षित करण्यात आले आहे.  या आरक्षणामुळे शहरातील विविध समाज घटकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाची सोडत सोमवारी

संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी   मुंबई -राज्याती २४७नगरपालिका आणि १४७नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या ६ ऑक्टोबरला सोमवारी सोडत काढली जाणार आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही सोडत काढली जाईल. या आरक्षण सोडतीच्या संदर्भात नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी शुक्रवारी राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. आरक्षण सोडतीसाठी पक्षाच्या दोन प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.

अ. भा. मराठा महासंघाच्या वतीने युवा उद्योजक राज पुन्शी यांचा वाढदिवस साजरा

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  चाळीसगाव (वार्ताहर) शासकीय विश्रामगृह येथे २ ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता युवा उद्योजक राज पुन्शी यांचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने साजरा करण्यात आला. याबाबत माहिती अशी की,अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने युवा उद्योजक राज पुन्शी यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने शासकीय विश्रामगृह येथे निवोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज पुन्शी यांना सर्वांनी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा तसेच चाळीसगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या देखील शुभेच्छा दिल्यात . तदनंतर शाल श्रीफळ देऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. राज पुन्शी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खुशाल बिडे व अशोक भोसले यांनी आपले मनोगतात सांगितले की, पुन्शी परिवार हा सर्व जातीधर्माच्या सुख, दुःखात नेहमी हजर राहणारा आहे. तसेच गोरगरिब जनतेला संकटकाळीन नेहमी आवश्यक ती मदत देखील करण्याचा नेहमी पुढाकार असतो. त्यामुळे पुन्शी परिवाराचे नेतृत्व आणि दातृत्व विसरता येणार नाही. यावेळी खुशाल बिडे,अशोक भोसले,नंदकिशोर पाटील,सचिन गुंजाळ ,कैलास पाटील,सिद्धांत पाटील,शेखर पाटील, प्रल्हाद बळे,  भैय्...