राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने बक्षीस वितरण सोहळा संपन्न
संपादक -सचिन गुंजाळ नवं दृष्टी न्यूज चाळीसगाव (वार्ताहार) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने 12 जानेवारी 2026 सकाळी 9 वाजता राष्ट्रीय कन्या शाळा येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजमाता जिजाऊ यांचे जीवनावर आधारित निबंध स्पर्धा 6 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय कन्या शाळा चाळीसगाव येथे घेण्यात आल्या होत्या .यावेळी या निबंध स्पर्धेत 480 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता .या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता राष्ट्रीय कन्या शाळा येथे आयोजित करण्यात आला होता . यावे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळीइयत्ता 8 प्रथम क्रमांक हर्षदा रविकिरण चव्हाण, द्वितीय क्रमांक पिंकी रामू कदरे, तृतीय क्रमांक श्रद्धा आशिष अहिरे, इयत्ता 9 वी प्रथम क्रमांक नेहा बापू चव्हाण, द्वितीय क्रमांक सेजल समीर धर्माधिकारी ,तृतीय क्रमांक यशश्री मनोज माळ...