अखिल भारतीय मराठा महासंघाची ओढरे गावात फलक अनावरण
संपादक - सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज
चाळीसगाव (वार्ताहर )अखिल भारतीय मराठा महासंघाची ओढरे गावात फलक अनावरण 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ओढरे गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अखिल भारतीय मराठा महासंघाची 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता शाखेचे अनावरण चे नियोजन करण्यात आले होते . मा.राजेंद्र भाऊ राठोड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांची आरती करण्यात आली. गावातील ज्येष्ठ मंडळी यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.ओढेरे गावातील या फलक अनावरण निमित्ताने गावातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहकार्य केले . यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांनी आपल्या मनोगत सांगितले की , समाज एकजूट असावा, ग्रामीण भागात अनेक समस्या असल्यास त्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून निवेदन देऊन आंदोलन करण्यात येईल . मराठा समाजबांधवर अन्याय अत्याचार झाला तर अखिल भारतीय मराठा महासंघ आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. तसेच इतर समाजातील कोणावरही अन्याय झाल्यास त्यास न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व सर्वात पुढे राहील. शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील यांनी मराठा महासंघाचे ध्येयधोरण व कामकाज समजून सांगितले. मा.राजेंद्रभाऊ राठोड यांनी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले शाखा अध्यक्ष भगवान इंगळे , उपाध्यक्ष रमेश देशमुख, सचिव बद्रीनाथ इंगळे ,संघटक राहुल पाटील,खजिनदार पंकज देशमुख ,सल्लागार राजेंद्र इंगळे आहेत. यावेळी फलक अनावर प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून *जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे हे होते यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले,शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, शहर सचिव सचिन गुंजाळ,तालुका संघटक शेखर पाटील तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील , युवक तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव ललित पाटील,युवक उपाध्यक्ष ललित पाटील धनराज सूर्यवंशी, बाळासाहेब निकम राजेंद्रभाऊ राठोड तसेच पोलीस पाटील अर्जुन निकम तंटामुक्ती अध्यक्ष बाळा जाधव बाळू आप्पा* आदी उपस्थित होते.






Comments
Post a Comment