अखिल भारतीय मराठा महासंघाची ओढरे गावात फलक अनावरण
संपादक - सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज चाळीसगाव (वार्ताहर )अखिल भारतीय मराठा महासंघाची ओढरे गावात फलक अनावरण 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ओढरे गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अखिल भारतीय मराठा महासंघाची 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता शाखेचे अनावरण चे नियोजन करण्यात आले होते . मा.राजेंद्र भाऊ राठोड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांची आरती करण्यात आली. गावातील ज्येष्ठ मंडळी यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.ओढेरे गावातील या फलक अनावरण निमित्ताने गावातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहकार्य केले . यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांनी आपल्या मनोगत सांगितले की , समाज एकजूट असावा, ग्रामीण भागात अनेक समस्या असल्यास त्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून निवेदन देऊन आंदोलन करण्यात येईल . मराठा समाजबांधवर अन्याय अत्याचार झाला तर अखिल भारतीय मराठा महासंघ आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. तसेच इतर समाजातील कोणावरही अन्याय झाल्यास त्यास न्याय मिळवून देण्यासाठी आ...