Posts

Showing posts from April, 2026

वाळू डंपर अपघात तपास एलसीबी कडे वर्ग करावा तसेच गिरणा नदीपात्रातून वाळू चोरी बंद करा अखिल भारतीय मराठा महासंघ

Image
  नवं दृष्टी न्यूज  संपादक -सचिन गुंजाळ  चाळीसगाव (वार्ताहर ) मेहुणबारा गुन्हा रजी नंबर77/2026 हा गुन्हा   एलसीबी कडे वर्ग करावा तसेच वाळू चोरी बंद करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार व अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम यांच्याकडे करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की चाळीसगाव तालुक्यातील धुळे सोलापूर महामार्गावरील दसेगाव फाट्याजवळ 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता चंचल नामदेव लांडगे राहणार रहीपुरी व वैष्णवी वैभव चौधरी राहणार चाळीसगाव या दोन्ही विद्यार्थिनी स्कुटीने राहिपुरी जात असताना दसेगाव  फाट्याजवळ  भरधाव वेगाने वाळूच्या डंपर ने स्कुटीला जोराने धडक दिली डंपरच्या दनक्याने दोन्ही विद्यार्थी जोराने रस्त्यावर फेकल्या गेल्या त्यात जबर मार लागल्याने चंचल नामदेव लांडगे हिचा जागीच मृत्यू झाला वैष्णवी वैभव चौधरी  हिची  प्रकृती चिंताजनक आहे     संतप्त ग्रामस्थ घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते व महामार्ग ग्रामस्थांनी रोखून ठेवला होता संतप्त ग्रामस्थांचा ...