Posts

Showing posts from October, 2022

हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे नवरात्रीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या मातृशक्ती सन्मान सोहळ्यात पोलीस दलातील नारीशक्तींचा सन्मान

Image
  मलकापूर प्रतिनिधी   मातृशक्तीच्या उपासनेचे पर्व म्हणजेच नवरात्रोत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जात आहे.या पर्वामध्ये नारीशक्तीचे पूजन करून उपासना करण्यात येते. भारतीय संस्कृतीच्या उदय कालापासूनच मातृ शक्तीचे किती अगाध व मोठे स्थान आपल्याला लाभलेले आहे हे या उत्सवा मधून प्रतीत होत असते. म्हणूनच हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूर नेहमी सामाजिक कार्याला केंद्रबिंदू मानून त्यानुसार कार्यरत आहे.    त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवानिमित्त या मातृशक्तींचे, नारीशक्तींचे सन्मान रुपी पूजन व्हावे म्हणून विविध क्षेत्रात आपले कार्यरुपी योगदान देणाऱ्या नारीशक्तींचा सन्मान गत सप्ताहभरात सुरू असून आज दि. 1/10/2022 रोजी जनतेच्या रक्षणासाठी म्हणजेच "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" या ब्रीद वाक्याच्या पदपथावर कार्यरत असणाऱ्या म्हणजेच पोलीस दलामध्ये सेवा देणाऱ्या नारीशक्तींचा हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर यांच्याकडून मलकापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या पीएसआय स्मिता म्हसाय मॅडम व पोलीस कॉ.श्रीमती वाढेमॅडम यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देत सन्म...

शारदीय नवरात्री निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मातृशक्तींचा हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूरतर्फे यथोचित सन्मान

Image
  धर्मेशसिंह राजपूत प्रतिनिधी    आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरे करण्यात येतात. त्यापैकीच नवरात्री हा देवीचा उत्सव  संपूर्ण भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. ह्याला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. देवी मातेने नऊ दिवस दैत्यांशी युद्ध करून महिषासुर नामक राक्षसाचा नाश केला होता म्हणून देवी मातेला महिषासुर मर्दिनी देखील म्हणतात. अशा या शक्तीचा म्हणजेच मातृशक्तीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने भक्तांकडून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीच्या इतिहासाला मातृशक्तीचे मोठे योगदान लाभलेले आहे. इतिहासाची पाने उलटली तर महाराणी पद्मावती, राजमाता जिजाऊ मासाहेब,माता रमाबाई आंबेडकर,झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, श्रीमती इंदिरा गांधी व नुकतीच भारताच्या सर्वोच्च स्थानी म्हणजे राष्ट्रपतीपदी निवड झाली असणाऱ्या श्रीमती द्रौपदी मूर्मू हे या मातृशक्तीचे प्रतीक आहे. वेळोवेळी या मातृ शक्तीने आपल्या देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी अविस्मरणीय असे कार्य के...